Monday, August 25, 2008

आवडलेले थोड़े काही...

संवेदने सुरु केलेला खो-खो मस्त रंगात आला आहे। त्यात मला सामील केल्याबद्दल अ सेन मॅनचे आभार.


१) पाउस- सौमित्र


त्याला पाउस आवडत नाही, तिला पाउस आवडतो...
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाउस आवडत नाही...
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.

पाउस म्हणजे चिखल सारा, पाउस म्हणजे मरगळ...
पाउस म्हणजे गार वारा, पाउस म्हणजे हिरवळ.

पाउस कपडे ख़राब करतो, पाउस वैतागवाडी...
पाउस म्हणजे भिजरी पायवाट, पाउस म्हणजे झाडी.

पाउस रेंगाळलेली कामे, पाउस म्हणजे सुट्टी उगाच...
पावसामधे गुपचुप निसटुन मन जाउन बसतं ढगात.

दरवर्षी पाउस येतो, दरवर्षी असं होतं...
पावसावरून भांडण होउन लोकांमधे हसं होतं.

पाउस आवडत नसला तरी ती त्याला आवडते...
पावसासकट आवडावी ती म्हणुन तीही झगड़ते.

रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात...
त्याचं तीचं भांडण असं, ओल्याचिंब दिवसात.


२) रंग माझा वेगळा- सुरेश भट

रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा:
'चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

माझा खो राज अणि विशाखाला :)

8 comments:

a Sane man said...

zakkas...:)

Raj said...

Thanks Anand, lavakarach Takato.
Kavita avaDalya!

Bhitri Bhagu said...

Donhi kavita khup chan aahet.

TheKing said...

I love both these, from my favorites collections!

Anand Sarolkar said...

@ Sane Man: :)

@ Raj: tu dilelya kavita pan mast ahet :)

@Bhitri Bhagu & the king: thanks :) Donhi kavita khupach lokpriya ahet.

विशाखा said...

amhala kho dila, pan shodhayatre var barech diwsat kahi navin nahi te???

यशोधरा said...

mast kavita post kelyat! :)
ani itake divas tujha/tumacha blog mala kasa naahi sapadala?

Anand Sarolkar said...

thanks :) "Tujha" barobar ahe :)