Thursday, February 12, 2009
आळस आणि गुलज़ार...
पूरे का पूरा आकाश घूमाकर बाज़ी देखी मैंने।
काले घर में सूरज रखके तुमने शायद सोचा था...मेरे सब मोहरे पिट जायेंगे।
मैंने एक चिराग जलाकर अपना रास्ता खोल लिया।
तुमने एक समंदर हाथ में लेकर मुझपर ढेल दिया।
मैंने नू की कश्ती उसके ऊपर रख दी।
काल चला तुमने और मेरी जानिब देखा।
मैंने काल को तोड़ के...लम्हा लम्हा जीना सिख लिया।
मेरी खुदी को तुमने चंद चमत्कारों से मारना चाहा।
मेरे एक प्यादे ने तेरा चाँद का मोहरा मार लिया।
मौत की शेह देकर तुमने समझा था...अब तो मात हुई।
मैंने जिस्म का होल उतार के सौंप दिया और रूह बचाली।
पूरे का पूरे आकाश घूमाकर अब तुम देखो बाज़ी।
-गुलज़ार
Monday, October 27, 2008
Monday, August 25, 2008
आवडलेले थोड़े काही...
संवेदने सुरु केलेला खो-खो मस्त रंगात आला आहे। त्यात मला सामील केल्याबद्दल अ सेन मॅनचे आभार.
१) पाउस- सौमित्र
त्याला पाउस आवडत नाही, तिला पाउस आवडतो...
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाउस आवडत नाही...
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.
पाउस म्हणजे चिखल सारा, पाउस म्हणजे मरगळ...
पाउस म्हणजे गार वारा, पाउस म्हणजे हिरवळ.
पाउस कपडे ख़राब करतो, पाउस वैतागवाडी...
पाउस म्हणजे भिजरी पायवाट, पाउस म्हणजे झाडी.
पाउस रेंगाळलेली कामे, पाउस म्हणजे सुट्टी उगाच...
पावसामधे गुपचुप निसटुन मन जाउन बसतं ढगात.
दरवर्षी पाउस येतो, दरवर्षी असं होतं...
पावसावरून भांडण होउन लोकांमधे हसं होतं.
पाउस आवडत नसला तरी ती त्याला आवडते...
पावसासकट आवडावी ती म्हणुन तीही झगड़ते.
रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात...
त्याचं तीचं भांडण असं, ओल्याचिंब दिवसात.
२) रंग माझा वेगळा- सुरेश भट
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा:
'चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
Wednesday, July 30, 2008
पूर्ण!
तो परत एकदा मोबाइल बघतो, स्क्रीन वरचं घडयाळ ९.१० दाखवत असतं. आज पुन्हा उशीर! तो पटापट तयार होत असतानाच ती त्याला breakfast करता बोलावते. तो तसाच किचनमधे धावतो. एका हातात प्लेट अणि एका हातात कॉफीचा कप घेउन तो ड्राइंग हॉल मधे येतो. सोफा अणि दीवाण सामानाच्या खोक्यानी व्यापलेले बघून तो खाली ज़मीनीवरच बसतो. ती पण आपली प्लेट अणि कप घेउन येउन बसते. दोघंही खाता खाता घरात लागणार्या सामानाची यादी करतात. तो बूट घालून निघायच्या तयारीत असतो, ती मागचा पसरा अवरत असते अणि गुणगुणत असते...
बड़ी नाज़ुक है यह मंजिल
मुहब्बत का सफर है...
दाराशी पोचलेला तो वळून तीच्याकडे बघतो. ती त्याला बघते. दोघंही हसायला लागतात, दोघांच्याही मनात एकच आठवण डोकावत असते....
६६९ दिवसांपूर्वी...
एक सुंदर, निवांत रस्ता अणि त्या रस्त्यावर तो अणि ती. तो गाड़ी चालवतो आहे अणि ती मागे बसून गुणगुणते आहे.
बड़ी नाज़ुक है यह मंजिल
मुहब्बत का सफर है...
Tuesday, April 22, 2008
भय इथले संपत नाही...
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकाविली गीते
हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया
त्या वेली नाज़ुक भोळ्या
वारयाला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते
की परतायाची ghaaee
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई
-कवि ग्रेस
ही माझी अत्यन्त आवडती कविता. काल पासून ही कविता सतत डोक्यात घोळते आहे.
Monday, March 10, 2008
फट्टू साला!
बस हा एकच प्रश्न डोक्यात फिरत राहिला ते सगळं वाचून. सध्या "The Kite Runner" वाचतो आहे. नेहमी कसा पुस्ताकचं जे मध्यवर्ती पात्र असतं त्याच्याबद्दल खुप उत्सुकता, प्रेम अणि जिव्हाळा वाटत असतो, पण ह्याच्यासोबत तसा होतच नही आहे उलट जसजसं पुस्तक वाचतो आहे तसा त्या पात्रबद्दल राग घृणा वाढतच जाते आहे.
ज्यच्यासोबत तुम्ही दिवस रात्र खेळता, रहता, जो तुमची इतकी सेवा (खरं तर चाकरी) करतो, जो फ़क्त तुम्ही जिंकावं म्हणुन तुमच्यासाठी एका ५० पैशाच्या पतंगामागे जीव खाऊन धावतो, त्याला तुम्ही काय देता? त्याला संकटात सापडलेलं बघवत नही म्हणुन भिंती आड़ लपून गाळलेले ४ अश्रु? त्याला समोर बघून काही घडलच नाही या आविर्भावाचे प्रश्न?
माणूस खरच इतका दगड बनू शकतो?
Wednesday, March 5, 2008
पिंजरा
स्वतःचीच कीव
अडकलास असा
पिंजर्यामध्ये
पंखांची फडफ़ड
उडण्याची धडपड
बघणार कोण
पिंजर्यामध्ये
ती गगन भरारी
मनाची उभारी
स्वप्नवत सारी
पिंजर्यामध्ये
मनातली खळबळ
जीवाची तडफ़ड
बांधणार कशी
शब्दांमध्ये?