Monday, March 10, 2008

फट्टू साला!

कोणी इतकी फट्टू कसं असू शकतं ???
बस हा एकच प्रश्न डोक्यात फिरत राहिला ते सगळं वाचून. सध्या "The Kite Runner" वाचतो आहे. नेहमी कसा पुस्ताकचं जे मध्यवर्ती पात्र असतं त्याच्याबद्दल खुप उत्सुकता, प्रेम अणि जिव्हाळा वाटत असतो, पण ह्याच्यासोबत तसा होतच नही आहे उलट जसजसं पुस्तक वाचतो आहे तसा त्या पात्रबद्दल राग घृणा वाढतच जाते आहे.
ज्यच्यासोबत तुम्ही दिवस रात्र खेळता, रहता, जो तुमची इतकी सेवा (खरं तर चाकरी) करतो, जो फ़क्त तुम्ही जिंकावं म्हणुन तुमच्यासाठी एका ५० पैशाच्या पतंगामागे जीव खाऊन धावतो, त्याला तुम्ही काय देता? त्याला संकटात सापडलेलं बघवत नही म्हणुन भिंती आड़ लपून गाळलेले ४ अश्रु? त्याला समोर बघून काही घडलच नाही या आविर्भावाचे प्रश्न?
माणूस खरच इतका दगड बनू शकतो?

8 comments:

Abhijit Bathe said...

आनंद - मला हे पुस्तक वाचायचं होतं पण आधी पिक्चर पाहिला, त्यामुळे पुस्तक लांबणीवर पडलं. बऱ्याचदा पिक्चर पुस्तकाएवढा चांगला होऊ शकत नाही, पण जर पुस्तक पिक्चरएवढं चांगलं असेल, तर तुमचं लेखकाबद्दलचं मत ऐकायला आवडेल. पण हे खरंय - बहुतांश वेळ लेखक स्वार्थी वाटतो.
त्याच्यासाठी ’एवढं’ करणाऱ्या मित्राबद्दल तर तो downright क्रूर बनतो. पण I hope पिक्चरमधल्यासारखाच तो शेवटी शेवटी पुस्तकातही बदलतो.

HAREKRISHNAJI said...

Interesting
कथे बद्द्ल अधिक सविस्तर लिहाल का ?

Anand Sarolkar said...

@abhijit: hehehe...me picture nahi pahila fakt pustak vachla ahe, tyamule me compare nahi karu shaknar pan jya style madhe pustak lihila ahe tyavarun vatata ki picture ani pustak equally changla asnar karan director la apla skill dakhavaycha khup scope ahe story madhe. Pustakat pan hero shevati shevati badalto pan te characterch asa ahe ki sveta paryant kadhi tyachyasathi proud feeling nahi ala...khara tar sympathy vatali mala shevati.

@harekrishnaji: tumhi pustak vacha rao...kathe baddal kay lihu me :-)
tumhi "Lakshya" pahila ahe ka? tyat kasa Hritik picture madhe badalat jato...tasach kahisa hyat pan ahe...hero swathla olakhayla lagto ani badlat jato...

Anonymous said...

Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Impressora e Multifuncional, I hope you enjoy. The address is http://impressora-multifuncional.blogspot.com. A hug.

Monsieur K said...

did u finish reading the book?
guess ur opinion might have changed at the end ;-)

Anand Sarolkar said...

@ Ketan: Yeah...I did manage to finish the book. Yes, my opinion did change at the end but I never felt proud for Amir, Infact I felt sympathetic.

विशाखा said...

खरं म्हणजे मी पुस्तक वाचलं नाहिये, पण पिक्चर पाहून पुस्तक वाचायचंच, असं ठरवलं. तुम्ही ह्या पुस्तकावर प्रतिक्रिया लिहिली, त्याबद्दल आधी धन्यवाद!

मात्र एक सांगावसं वाटतं, की तुम्ही आज एक वयोवृद्ध (adult ह्या अर्थाने) व्यक्ती म्हणून आमिरच्या व्यक्तिरेखेला, “फट्टू.” म्हणून संबोधता आहात.
पण आमिरची व्यक्तिरेखाच अशी आहे- त्याच्या वडिलांनी जी कठोर भूमिका त्याकाळच्या क्रांतीमधे घेतली, ती घेण्याचं धैर्य त्याच्यात नाही. तसंच, आपल्या मित्रावर अत्याचार होतांना बघून त्याची मदत करायला जायचंही धैर्य त्याच्यात नसतं. एकतर लहान मुलांना मुळातच आपली दुसऱ्यांवर अवलंबिता, आणि शक्तीहीनता, कुठेतरी सुप्त मनात जाणवत, आणि टोचत असते. त्यावेळी धैर्य कितीक असलं, तरी आपल्याकडे अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती असेल की नाही, ह्या विचारानेच पाय गळतात....

त्या प्रसंगानंतर लगेच आमिर आपल्या मित्रावर उलट चिडून त्याला नामोहरम करतांना, खरं म्हणजे स्वत:चाच राग स्वत:वर काढत असतो- हे निदान चित्रपटात तरी अतिशय उत्तमरित्या दाखवलं आहे.
त्यामुळे जरी मलाही प्रथमत: आमिरसारख्या पुचाट narrator चा राग आला होता, तरी, या कादंबरीचा प्रवास म्हणजे, आमिरला स्वत:चं स्वत्त्व कसं आणि कोणती किंमत देऊन सापडतं, हाच आहे, असं मला वाटतं.
करणारे करतात, आणि ज्यांना काही करता येत नाही, ते लिहितात, ह्या उक्तीचं सार्थ उदाहरण म्हणजे आमिर. त्यामुळे त्याचं लेखक असणं केवळ प्रासंगिक नसून एका सांकेतिक पातळीवरचंही आहे, असंही मला वाटतं.

Anand Sarolkar said...

@ Vishakha: Nice to read your different perspective on this.