Tuesday, April 17, 2007

शोधयात्रा...

अजुन ही स्पष्ट आठवतो मला तो दिवस, १/१२/२००५. प्लेसमेंट सीज़न सुरु झाला होता. क्लास मधले १५ लोक प्लेस झाले होते. कैम्पस साठी TCS आणि ISGN येणार होती. सकाळ पासून मनात धक्धुक सुरु होती. TCS मधे तर मला अप्लाय पण करता नाही आल ( इंजीनियरिंग मधे केलेली मस्ती भोवली ;)) ISGN ला पण अप्लाय केला होता म्हणून मग त्याच्या shorlist ची वाट बघत होतो. दुपारी मी आपला मस्त इकडे तिकडे भटकत होतो तेंव्हा एका सरानी मला सांगितला की मी ISGN साठी shortlist झालो आहे आणि १० मिनिटात माझा interview आहे म्हणून. मी धावत पळत quadrangle मधे पोहोचलो. interview साठी जेंव्हा रूम च्या बाहेर उभा होतो तेंव्हा गेली २ वर्ष झरझर डोळ्या समोरून गेली. interview तर चांगला पार पडला. अब इंतज़ार था रिजल्ट का। पहिल्या मजल्यावर मीटिंग सुरु होती आणि आम्ही सर्व जण खाली रिजल्टची वाट बघत होतो. माझा नाव जाहीर झाल्यावर १ मिनट मला कही सुचलंच नाही. त्या नंतर कंपनी मधल्या लोकांना भेटुन खाली येताना मनात जे कही सुरु होता ते शब्दात मांडणे खूप कठिण आहे. मग रात्री मित्रांसोबत धमाल मस्ती झाली आणि वाटलं की आयुष्य म्हणजे तरी अजुन काय असतं? अणि याचं उत्तर माझ्या मानाने असं दिलं...

नवी स्वप्न, नव्या आशा
नवी दिशा, नव्या वाटा
आयुष्य म्हणजे शोधयात्रा...

शोध असतो सुखाचा
शोध असतो यशाचा
अपयाशाच्या जख्मेवर
यश हीच एक मात्रा
आयुष्य म्हणजे शोधयात्रा...

नाविन्याची ओढ़ असते
त्याला चैतान्याची जोड़ लाभाते
सोबत असते प्रयात्नांची पराकाष्ठा
आयुष्य म्हणजे शोधयात्रा...

4 comments:

Monsieur K said...

tujhya shodh-yaatre chi suruvaat chaangli jhaali aahe.
all the best!

Anand Sarolkar said...

Thanks :) Ketan!

Meghana Bhuskute said...

No wonder your favourite is 'five point someone'!!!
BTW thanks for the comment on my blog.
:)

अवधूत डोंगरे said...

chhan kavita ahe.