Wednesday, May 9, 2007

कालचा पाऊस

संध्याकाळ सरुन अंधार दाटत होता आणि तशातंच मळभ दाटून आलं आकाशात अणि मनात पण...
आणि मग...

काल रात्री पाऊस आला
एकटाच शांतपणे
ना वारा सोबत ना आठवणी!

मीही तसाच बसलेलो
एकटा शांतपणे
ना मी कोणाचा ना माझा कोणी!

तो बराच वेळ टपटपला
अगदी संथपणे
ना मी हट्कले ना त्याला घाई!

आम्ही संवाद ही साधला
चुपचाप मूकपणे
निर्भाव तो अन् निःशब्द मी!

तो आला तसाच गेला
उदास दीनपणे
ना त्याचे ढग भरलेले
ना माझ्या डोळ्यात पाणी

7 comments:

Vidya Bhutkar said...

आनंद कविता छान आहे, खूपच.पावसाच्या खूप कविता वाचल्यात पण यातील कल्पना वेगळीच आहे. चिकित्सेबद्दल क्षमस्व पण, एक शब्द जरा खटकला..'दिनपणे', तो 'दीनपणे' असा लिहायला हवा होता.
-विद्या.

Anand Sarolkar said...

Thanks Vidya :)

TheKing said...

I liked the thought.

Sunnapana gheun yenara paus sagalyancha favourite nasla tari to asto he matra khare.

Ranjeet said...

Chhan lihile aahes, Anand! Kavita avadali!

Anand Sarolkar said...

@ theking: Can't agree more with you.

@ Ranjeet: Dhanyawad :)

Kamini Phadnis Kembhavi said...

आनंद छान आहे कविता आवडली :)
माझ्या blog वर तुझ उत्तर आहे बघ

Anand Sarolkar said...

@ Ajit: Glad that you looked it. Thanks for dropping by...