Tuesday, October 23, 2007

संध्याकाळ

धुंद ही संध्याकाळ
मंद गार वारा
आठवणीने तुझ्या
कासावीस जीव झाला!

दूरवर चमकतो
आकाशात एकच तारा
वेड्या माझ्या मनात
तुझाच विचार सारा!

संध्याकाळ सरून
काजळल्या या दिशा
तू येण्याच्या आता
मावळल्या साऱ्या आशा!

नाही आलीस तू
म्हणुन दुःख झाले ज़रा
उद्या पुन्हा...
तीच धुंद संध्याकाळ
तोच मंद वारा!

No comments: