Tuesday, October 23, 2007

इति श्री माधव आपटे!

चित्र...माती...माती...माती, त्यावर शेणाने सारवून, त्यावर रांगोळी, चित्र असं होतं. मग तिथे डांबर टाकून सुरु झालं हे सगळं. हव्यास...हव्यास जडला, अधिक जस्तीचा हव्यास. आंगण वावर पूरेना, मग नौकरी धंदे सुरु झाले. नौकरित पगार पूरेना, धंद्यात नफा पूरेना, मग तो मिळवणं सुरु झालं. पगार वाढीसाठी संप, दमदाट्या, मोर्चे. नफा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरीमिरी, चोरी. शेवाळ वाढतच गेलं. दलदलित फसत गेलं सालं कमळ.

छान लिहीयचो, चित्र काढायचो. पण मग पैसे हवेत, स्थिरता म्हणुन बँकेत! B.com पर्यंत एवढा शिकलो, एवढ , पण पुढे काय? तर ledger भरा, परिपत्रकं लिहा, जेवढं नहायलो आधी तेवढा कोरडा होत गेलो. थेंब सुद्धा उरला नाही ...ओलाव्याचा...दाखवायला सुद्धा . एका रेषेत उभे रहा...एका रेषेत लिहा...एका दमात पदवी मिळवा...एका वर्षात कायम व्हा...एका इच्छे साठी लग्न करा... आणि ती दुहेरी करण्यासाठी...मूलं जन्माला घाला...एक एक करून अनेक गोष्टी करा आणि मग एकदा...मरा! म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचा, एकटं जायचा आणि मधे हा...साला जीव घेणा प्रवास साला...
आणि मग साला हा प्रवास, प्रवास सरळ नको का? ...मनासरखा नको का?

अरे ठरवलं ना सगळ्यांनी की नियम करायचे, पाळायचे?
मग मोडायची घाई का?
सगळ्यांनी मिळुन खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं?
ठरवा...शिस्त नको! मग व्हा...बेशिस्त व्हा!
लाज सोडायची तर मग सगळ्यांनी सोडा...एकट्य़ाने कशाला?
एकट्याला कशाला ते ओझं?
जगा आणि जगू दया! हा जर नियम नको असेल, आणि मग सर्वांनी मिळुन एक ठराव करा आणि म्हणा...
मारू आणि मरुया...सगळ्यांना मारू।
संपवून टाकू हे सगळं आणि सांगू त्या विधात्याला...नाही आवडला तुझा खेळ...नाही आवडला मला तुझा खेळ!

I undersigned Madhav Apte making this declaration at due to my own philosophies I am not eligible to live on this planet. So please take away my services and I don't expect any payment from you...I don't! Infact I would like to give all dues on my account.
So please Lord...GOD...
And I am enclosing my body with my soul, intact with this declaration. So please accept this and relieve me at the earliest...PLEASE!

Thanking You.
Yours Faithfully...

*********************************

"डोंबिवली फास्ट" मधला हा सीन बघितला की सुन्न व्हायला होतं. इथे छापले आहेत ते फ़क्त शब्द! ती चिडचिड...तो वैताग...ती घुस्मट, ते सगळं नाही दाखवता येत इथे. संदीप कुलकर्णी यांनी अक्षरशः जीव ओतला आहे.

आपल्यावर कधी अशी वेळ अली तर?
होईल सहन?
की आपला पण होईल असाच...माधव आपटे!

11 comments:

a Sane man said...

व्हायला नको. हे असं होऊ शकतं हे जसं मनात साचलंय तसंच दवाखान्यातील आजींचं वाक्यही बिंबवून ठेवावं..."तुझ्यासारख्या गुंडाची मदत घेण्यापेक्षा मी अश्शीच मरेन..."...जाणीवेत हेही असलं म्हणजे माधव आपटे न होणं सोपं जाईल..कदाचित...

सर्किट said...

aayla, post ardhyahun adhik vachat yeiparyant ghabaraleloch hoto ki he kaay aahe?

mag cinema cha reference vachala ani ni:shwas Takala. :)

pahayala pahije ha cinema ata. utsukata vaDhaliye!

Anand Sarolkar said...

@ a sane man: Hmmm...Kadachit tu mhantos te barobar ahe.

@Circuit: Nakki Bagh! Mast Cinema ahe. Ani ya scene madhli Sandeep Kulakarnichi acting bagh. Akshsrsh:ha tochata tyacha bolana.

कोहम said...

Anand....I had written something about the same long time back.....but I was incolclusive too...these questions normally remain unanswered. Though we know what the right answers are...

राफा said...

आनंद, मलाही खूप आवडला होता तो सीन (आणि सिनेमाही). प्रेक्षकांची एकंदर परिस्थितीबद्दलची मन:स्थिती अचूक ओळखून, त्यावरचं उत्तर / तात्पुरतं मलम म्हणून म्हणा जे काहिसं 'फॅन्टास्टिक' घडतं होतं ते हवसं वाटत होतं खरं

(हिंसा हे सगळ्याला सोपं उत्तर आहे का किंवा घटनांमधली तर्कशुद्धता ह्याचा उहापोह करण्याऐवजी सिनेमा मी वेगळ्या अर्थी 'एन्जॉय' केला.. )

अरे ठरवलं ना सगळ्यांनी की नियम करायचे, पाळायचे?
मग मोडायची घाई का?
>>>>

हे भयंकर अपील झालेलं तेव्हा .. जिकडे तिकडे 'रडीचा डाव', माधव आपटे करेल तर काय करेल !

Anand Sarolkar said...

@Rahul: Agdi patala tu je mhantos te. Scene kharach appeal karun jato.

Nandan said...

hi anand, barech diwas kahi lihila nahis?

Ashok Suryavanshi said...

tuza blog vachun manat sachlela kagdavar utrava asa vatataya. chhan lihitos.
Ashok Suryavanshi

Anand Sarolkar said...

@ ashok: Dhanyawad :)

ऍडी जोशी said...

जंगलात जगायचं असेल तर जनावरच व्हावं लागतं. गाई सारखं गरीब होऊन जगता येईल. पण मग त्या साठी १००-२०० गाई एकत्र हव्यात. एकट्या गाईला कुणीही विचारत नाही. गुंडशाही ला गुंडशाही अथवा झुंडशाही हे दोनच पर्याय आहेत.

Anand Sarolkar said...

@ ADJ: SAhi funda ahe ha. awadya apunko ;)